१५ जानेवारीला मतदान : १८ जानेवारीला निकाल
सिंधुदुर्ग – महाराष्ट्रात ३४ जिल्ह्यांतील १४ सहस्र २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यानुसार १५ जानेवारी २०२१ या दिवशी मतदान होणार असून १८ जानेवारी २०२१ या दिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे. २३ ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत उमेदवारी अर्ज भरणे आणि अर्जांची छाननी होणार आहे, तर ४ जानेवारी २०२१ हा अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता या निवडणुकीत मुख्य लढत भाजप विरुद्ध शिवसेना अशी पहायला मिळणार आहे. तत्पूर्वी १६ डिसेंबरला सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.