कोकण रेल्वेमार्गावर हुंबरठ येथे रेल्वेची धडक बसून महिलेचा मृत्यू

कोकण रेल्वेमार्गावरून धावणार्‍या गाडीची धडक बसून तालुक्यातील बौद्धवाडी, हुंबरठ येथील रेल्वेमार्गावर २१ नोव्हेंबरला सकाळी एका महिलेचा मृत्यू झाला. मृतदेह छिन्नविछिन्न झाल्याने महिलेची ओळख पटलेली नाही.

भाजप नेत्यांचे विवाह ‘लव्ह जिहाद’मध्ये मोडत नाहीत का ?

मी भाजपच्या नेत्यांना विचारू इच्छितो की, ज्या भाजप नेत्यांच्या परिवारातील लोकांनी अन्य धर्मांमध्ये विवाह केले आहेत, ते ‘लव्ह जिहाद’च्या परिघात येत नाहीत का ? असा प्रश्‍न छत्तीसगडचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपला विचारला आहे.

(म्हणे) ‘महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायद्याची आवश्यकता नाही !’ – अस्लम शेख, पालकमंत्री, मुंबई उपनगर, काँग्रेस

लव्ह जिहादसारख्या फालतू गोष्टींना महाराष्ट्रात थारा नाही. त्यामुळे राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे मुंबई उपनगरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले.

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर वास्को पोलिसांनी उत्तर भारतियांना छठ पूजा करण्यापासून रोखले

बार चालू, रेस्टॉरंट चालू, कॅसिनो चालू. मग हिंदूंचे सण-उत्सव बंद का ? भाविक हिंदू कोरोनाची मार्गदर्शक तत्त्वे पाळत नाहीत आणि दारूडे पाळतात, असे प्रशासनाला वाटते का ?

कोल्हापूर येथील सी.पी.आर्. रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांवर उपचार चालू !

सी.पी .आर्. रुग्णालयात मागील ६ मासांहून अधिक काळ बंद असलेली वैद्यकीय उपचार सेवा चालू झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.  

बेळगाव येथे मराठी फलकाला फासले काळे !

मराठा विकास प्राधिकरण स्थापनेविषयी मुख्यमंत्री बी.एस्. येडीयुरप्पा यांचे अभिनंदन करण्यासाठी लावण्यात आलेल्या मराठी भाषेतील फलकाला २० नोव्हेंबर या दिवशी कन्नड भाषिकांनी काळे फासले.

कोरेगाव पोलिसांकडून गांजा तस्करांविरोधात धडक मोहीम

कोरेगाव पोलिसांनी गत आठवड्यापासून तालुक्यातील गांजा तस्करांविरोधात धडक मोहीम चालू केली आहे.पोलिसांनी संशयिताकडून ३ लाख रुपयांचा ४९ किलो गांजा कह्यात घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार्‍या शासकीय महापूजेला वारकरी पाईक संघाचा विरोध

कार्तिकी वारीसाठी वारकर्‍यांना बंदी असेल तर आमचाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार्‍या शासकीय महापूजेला विरोध राहील, तसेच येत्या विधान परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राणा महाराज वासकर यांनी सांगितले.

शस्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानच्या आक्रमणात कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक संग्राम पाटील हुतात्मा !

शस्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने केलेल्या आक्रमणात राजौरी येथे करवीर तालुक्यातील निगवे-खालसा येथील हवालदार संग्राम पाटील (३७ वर्षे) हे २१ नोव्हेंबर या दिवशी हुतात्मा झाले आहेत. ते गेली १७ वर्षे मराठा बटालीयनमध्ये सेवा बजावत होते.

कोरोनामुळे कार्तिकी यात्रा जिल्हा प्रशासनाने केली रहित !

वाढत्या कोरोना संसर्गामुळे या वर्षीची कार्तिकी यात्रा जिल्हा प्रशासनाने रहित केली आहे.श्री विठ्ठलाची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे.