वारजे (पुणे) पोलीस ठाण्यातील ३ निरीक्षकांसह ४ कर्मचारी निलंबित !

निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये वारजे पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक (सध्या नेमणूक सायबर पोलीस ठाणे) डी.एस्.हाके, तत्कालीन पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे, पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, यांच्यासह अन्य ४ जणांचा समावेश आहे.

गोराई (मुंबई) येथे १०० वर्षे जुने आणि जागृत श्री वांगणादेवीचे मंदिर पाडले !

पॅगोडा ज्या ठिकाणी आहे, ती भूमी मूळ मालकाने दुसर्‍याला दान केली आहे. त्यामुळे नव्या मालकाने गावकर्‍यांच्या धार्मिक भावना लक्षात न घेता मंदिरावर जेसीबी चालवला. 

पंढरीच्या वाटेवर दिंड्यांना शिधा पुरवणारा मिलिंद चवंडके हा मुलुखावेगळा प्रवचनकार ! – ह.भ.प. सतीश महाराज निमसे

आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या दिंड्यांना अनेकजण अन्नदान करतात; पण दिंड्यांमागे थेट टेंभूर्णीपर्यंत येऊन किराणा साहित्यासह उपवासासाठी फराळाचे विविध प्रकार अगदी दूधही पुरवून वारकर्‍यांशी समरस होणारे मिलिंद चवंडके हे महाराष्ट्र राज्यातील मुलूखावेगळे प्रवचनकार आहेत, असे कौतुकोद्गार ह.भ.प. सतीश महाराज निमसे यांनी काढले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात नृसिंह याग पार पडला !

महर्षींच्या आज्ञेने हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे आणि साधकांना होणारे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, या उद्देशांसाठी येथील सनातनच्या आश्रमात गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजे २ जुलै या दिवशी नृसिंह याग करण्यात आला.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा गुरुपौर्णिमा उत्सव २ आणि ३ जुलै या दिवशी येथील भक्तवात्सल्याश्रमाच्या जवळ असलेल्या नवनीत गार्डन येथे भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये साकारणार शिवराज्याभिषेक आणि स्वातंत्र्य चळवळीचे देखावे !

मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यशासनाकडून स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठीचे निकष आणि गुणांची वर्गवारी घोषित केली आहे. यामध्ये शिवराज्याभिषेक आणि स्वातंत्र्य चळवळ यांविषयीचे देखावे निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यासाठी सर्वांधिक गुण ठेवले आहेत.

‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’ यांद्वारे हिंदु धर्माला कमकुवत करण्‍याचे षड्‍यंत्र ! – पू. डॉ. शिवनारायण सेन, उपसचिव, शास्‍त्र धर्म प्रचार सभा, बंगाल

‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’ यांद्वारे हिंदु धर्माला कमकुवत करण्‍याचे षड्‍यंत्र रोखणे हे धर्मकर्तव्‍यच !

‘हिंदू एकता आंदोलना’चे संस्थापक नारायण कदम यांचे निधन !

समान नागरी कायदा झाला पाहिजे, अयोध्येत राममंदिर झाले पाहिजे, काश्मीरमधून ३७० कलम हटले पाहिजे, यासाठी त्यांनी लढा दिला आहे. मिरजेत झालेल्या ‘अरब हटाव’ मोहिमेत त्यांचा पुढाकार होता. नारायणराव यांच्या जाण्याने हिंदुत्वाची मोठी हानी झाली आहे.’’

विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाची सर्वाेच्च न्यायालयात याचिका !

१७ जुलै या दिवशी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे. त्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष हा निर्णय येतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अल्पवयीन युवतीच्या विनयभंगाच्या निषेधार्थ चंदगड (जिल्हा कोल्हापूर) बंद : संशयित पोलिसांच्या कह्यात !

२ जुलैला रात्री ७ वाजता संबंधित अल्पवयीन युवती घड्याळ दुरुस्तीच्या दुकानात गेली असता ७० वर्षीय व्यक्तीने तिचा विनयभंग केला. यानंतर युवतीने त्वरित सुटका करून घेत ती घाबरून पळत बाहेर आली.