
चंदगड (कोल्हापूर) – शहरात १३ वर्षीय अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांनी आवाज उठवत कडकडीत बंद पाळला. ७० वर्षीय संशयितावर पोलिसांनी ‘पोक्सो’ अंतर्गत कारवाई करत त्याला कह्यात घेतले आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
१. २ जुलैला रात्री ७ वाजता संबंधित अल्पवयीन युवती घड्याळ दुरुस्तीच्या दुकानात गेली असता ७० वर्षीय व्यक्तीने तिचा विनयभंग केला. यानंतर युवतीने त्वरित सुटका करून घेत ती घाबरून पळत बाहेर आली. (अशा अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी तात्काळ कठोर शिक्षेची तरतूद आवश्यक आहे ! समाजात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना पहाता स्वरक्षण प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता असल्याचे लक्षात येते ! – संपादक)
२. ही घटना नागरिकांना कळल्यावर संतप्त जमावाने ७० वर्षीय वृद्धास चोप दिला.
३. यानंतर ३ जुलैला नागनवाडी आणि पाटणेफाटा येथे ठिय्या आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !