हिंदु समाजाच्‍या संयमाचा अंत पाहू नका ! – नितेश राणे, आमदार, भाजप

हिंदूंवर कारवाई करणारे पोलीस औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍यांवर कारवाई करत नाहीत, हे लक्षात घ्‍या !

‘सेवा विकास बँके’चे माजी संचालक ‘ईडी’च्‍या कह्यात !

येथील सेवा विकास बँकेचे माजी संचालक आणि माजी उपमहापौर अमर मूलचंदानी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) कह्यात घेतले आहे. मुंबईतील विशेष न्‍यायालयाने त्‍यांना ७ जुलैपर्यंत इडी कोठडीत ठेवण्‍याचे आदेश दिले आहेत.

२ सहस्र रुपयांच्‍या नोटा पालटून घेतांना २ नक्षलसमर्थकांना अटक

२ सहस्र रुपयांच्‍या नोटा बंद केल्‍यानंतरची ही मोठी कारवाई आहे. ३० सप्‍टेंबरपर्यंत नोटा अधिकोषात जाऊन पालटून घेण्‍याची समयमर्यादा देण्‍यात आली आहे.

‘गीता प्रेस’ केवळ मुद्रणालय नाही, तर श्रद्धास्थान ! – पंतप्रधान मोदी

विदेशी आक्रमणकर्त्यांनी आमची ग्रंथालये जाळली होती. इंग्रजांनी आमची गुरुकुल परंपरा नष्ट केली. आमचे पूजनीय ग्रंथ लोप पावण्याच्या स्थितीत होते. अशा वेळी गीता प्रेससारख्या संस्थांनी त्यांना वाचवण्याचे काम केले. हे ग्रंथ आज घरोघरी पोचले आहेत. या ग्रंथांशी आपल्या पुढच्या पिढ्या जोडल्या जात आहेत.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्‍ट कालावधीत होणार !

७ जुलै या दिवशी विधीमंडळाच्‍या कामकाज सल्लागार समित्‍यांची बैठक झाली. या वेळी विधानसभेचे अध्‍यक्ष अधिवक्‍ता राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्‍या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी ही घोषणा केली.

भाजप नेत्‍या पंकजा मुंडे २ मास राजकारणापासून अलिप्‍त रहाणार !

ध्‍याच्‍या राजकीय घडामोडींच्‍या पार्श्‍वभूमीवर भाजप नेत्‍या सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी हा निर्णय घेतला आहे. त्‍यांच्‍या काँग्रेसमध्‍ये जाण्‍याविषयी चालू असलेल्‍या चर्चेवर प्रहार करत त्‍या म्‍हणाल्‍या की, मी कधी राहुल गांधी यांना भेटलेलीही नाही.

राज ठाकरे यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली !

या भेटीविषयी अद्याप एकनाथ शिंदे किंवा राज ठाकरे यांच्‍याकडून अधिकृतपणे वाच्‍यता करण्‍यात आलेली नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्‍यास शिवसेनेला अडचण येऊ शकते, अशी चर्चा आहे.

बसचालक शेख दानिश मद्यधुंद अवस्‍थेत असल्‍याने अपघात घडल्‍याची शक्‍यता !

प्रादेशिक परिवहन विभागाने टायर फुटल्‍यामुळे अपघात झाला का ?’, याचे अन्‍वेषण केले. त्‍यासाठी टायरच्‍या खुणा आणि नमुनेही पडताळण्‍यात आले; पण रस्‍त्‍यावर टायर फुटल्‍याच्‍या कोणत्‍याही खुणा आढळल्‍या नाहीत.

यापुढे बडव्‍यांची अपकीर्ती करण्‍याचा प्रयत्न केल्‍यास त्‍याच भाषेत उत्तर देऊ !

बडवे कुटुंबियांनी पंढरपूरच्‍या श्री विठ्ठलाची मागील सहस्रो वर्षे अविरत सेवा केली आहे. त्‍यामुळे त्‍यांचा अवमान थांबवा, असे आवाहन नाशिक येथील काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी केले आहे.

पुण्‍यातील दगडूशेठ मंदिरामध्‍ये विविध धार्मिक विधींसह अतीरुद्र महायज्ञाला प्रारंभ !

जगाचे कल्‍याण, तसेच महाराष्‍ट्र ‘सुजलाम् सुफलाम्’ होण्‍यासाठी दगडूशेठ गणपति मंदिरामध्‍ये महासुदर्शन होम, संतान गोपाळ कृष्‍ण होम, विष्‍णुसहस्रनाम अर्चना, रुद्र होम आणि गणेश याग यांसह विविध प्रकारच्‍या धार्मिक विधींनी अन् ११ दिवसांच्‍या ‘अतीरुद्र महायज्ञा’ला प्रारंभ करण्‍यात आला आहे.