फरीदकोट (पंजाब) येथे गुरुद्वारामध्ये २ गटांत हिंसाचार : तिघांना अटक

दोन्ही गटांनी तलवारीद्वारे एकमेकांवर वार केले. या प्रकरणी ९ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चंडीगड विद्यापिठातील ६० विद्यार्थिनींचे आंघोळ करतांनाचे व्हिडिओज सामाजिक माध्यमांतून प्रसारित

८ विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न : एकीची प्रकृती चिंताजनक
विद्यापिठातील एका तरुणीने व्हिडिओज बनवून मित्राला पाठवल्यावर त्याने केले प्रसारित !

सुवर्ण मंदिराजवळ तंबाखू आणि मद्य यांचे सेवन करणार्‍याची निहंग शिखांकडून हत्या

प्रसिद्ध सुवर्ण मंदिरापासून १ किमी अंतरावर निहंग शिखांनी एका व्यक्तीची हत्या केली. या व्यक्तीने तंबाखू आणि मद्य यांचे सेवन केल्यामुळे ही हत्या करण्यात आली. हरमनजीत सिंह असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या हत्येची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी हेरॉईन आणि अफू यांचा साठा केला जप्त

पाकिस्तानने भारताच्या विरोधातील कारवाया चालूच ठेवल्या आहेत. पंजाबमध्ये सातत्याने अमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाक तस्करांचा डाव उधळून लावला. सैनिकांनी मुहर जमशेर गावात ६.३७० किलो हेरॉईन, १९० ग्रॅम अफू आणि ३८ कोटी रुपयांची काडतूसे जप्त केली.

पंजाबच्या चर्चमध्ये येशूच्या मूर्तीची तोडफोड

३० ऑगस्टच्या रात्री साडेबाराच्या सुमारास ४ अज्ञातांनी चर्चमध्ये घुसून तेथील येशू आणि मेरी यांच्या मूर्तींची तोडफोड केली. तसेच येथे असणार्‍या पाद्य्राची गाडी जाळण्यात आली.

पंजाबमध्ये ५ मासांत १३५ भ्रष्ट अधिकार्‍यांना अटक

अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकार्‍यांची संख्या एवढी असेल, तर अटक न झालेले किती असतील, याचा विचारही न केलेला बरा ! प्रशासन भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाल्याचे हे द्योतक आहे !

पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांकडून आक्रमणाची शक्यता

खलिस्तानी आतंकवाद्यांची नांगी यापूर्वी ठेचण्यात आलेली आहे. आता त्यांची पुन्हा वळवळ चालू आहे.  या आतंकवाद्यांनी पुन्हा तोंड वर काढण्यापूर्वीच त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक !

अमृतसर (पंजाब) येथे चारचाकी गाडीच्या खाली बाँब ठेवून घातपाताचा कट उघड

पोलिसांना सीसीटीव्ही चित्रीकरणावरून माहिती मिळाल्यानंतर गाडीची तपासणी केल्यावर त्यांना गाडीच्या खाली लावलेला बाँब सापडला.

खलिस्तानी आतंकवादी पन्नू याच्या घरी पंजाबच्या लोकांनी फडकावला तिरंगा

आतंकवाद्यांच्या विरोधात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी अशीच एकजूट दाखवली, तर भारताच्या एकसंधतेला आव्हान देण्याचे कुणाचे धाडस होणार नाही !

भारतात घुसखोरी करणार्‍या दोघा पाकिस्तानी नागरिकांना अटक

त्यांच्याकडून २ भ्रमणभाष संच, ओळखपत्र आणि पाकिस्तानी रुपये जप्त करण्यात आले.