लुधियाना (पंजाब) येथे ५ हिंदु नेत्यांना पोलिसांकडून ‘बुलेट प्रूफ जॅकेट’ !

या नेत्यांना घराबाहेर न पडण्याची पोलिसांची सूचना !

हिंदुत्ववादी नेते अमित अरोरा

लुधियाना (पंजाब) – अमृतसर येथे शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांच्या हत्येनंतर पंजाब पोलिसांनी सुरक्षेसाठी लुधियानातील ५ हिंदु नेत्यांना, तसेच एका शीख नेत्याला ‘बुलेट प्रूफ जॅकेट’ दिले आहे. यात राजीव टंडन, योगेश बख्शी, अमित अरोरा, नीरज भारद्वाज आणि हरकीरत खुराना यांचा, तसेच काँग्रेसचे नेते गुरसिमरन सिंह मंड यांचा समावेश आहे. या सर्वांना आधीपासून पोलीस संरक्षण आहे. पोलिसांनी या हिंदु नेत्यांना घरातून बाहेर न पडण्याची सूचनाही दिली आहे.

पाकमधील खलिस्तानी आतंकवादी गोपाल चावला याने सूरी यांच्या हत्येनंतर आणखी हिंदु नेत्यांच्या हत्या करण्यात येणार असल्याची धमकी दिली होती. यात अमित अरोरा यांचे नाव होते. वर्ष २०१६ मध्ये त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण झाले होते. तेव्हापासून त्यांना संरक्षण देण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • यातून हेच स्पष्ट होते की, पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती फारच वाईट आहे. याकडे आता केंद्र सरकारने गांभीर्याने पहात लक्ष घातले पाहिजे !
  • हिंदूंच्या नेत्यांना घराबाहेर पडता येऊ शकत नाही, यावरून पंजाबची काश्मीरच्या दिशेने वाटचाल चालू झाली आहे, हेच लक्षात येते !