मोगा (पंजाब) येथील महाविद्यालयात काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांकडून पाकच्या क्रिकेट संघाचे समर्थन

हिंदु विद्यार्थ्यांनी विरोध करताच हाणामारी !

मोगा (पंजाब) – टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला. यावरून येथील गल कलान गावात लाला लजपत राय अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाच्या आवारात जम्मू-काश्मीरमधील मुसलमान विद्यार्थ्यांच्या गटाची बिहार अन् इतर राज्यांतील हिंदु विद्यार्थ्यांशी हाणामारी झाली. यात दोन्हींकडील काही विद्यार्थी घायाळ झाले. या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.

या सामन्याच्या वेळी काश्मिरी मुसलमान विद्यार्थी पाकिस्तानला पाठिंबा देत होते, तर बिहार आणि इतर राज्यांतील विद्यार्थ्यांच्या गटाने पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर या दोन्ही गटांत हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेकही झाली. आता येथे परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा स्थानिक पोलिस अधिकार्‍यांनी केला आहे. महाविद्यालयाचा परिसर आणि वसतीगृहाचा परिसर येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

  • काश्मीरची समस्या ही धार्मिक आहे, हेच यावरून लक्षात येते ! काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी तेथील जिहादी मानसिकता आणि पाकप्रेम नष्ट करणे आवश्यक आहे !
  • अशा घटनांमुळे देशातील राष्ट्रप्रेमी जनतेने काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांवर  बहिष्कार घातल्यास आश्‍चर्य वाटू नये !