मांढरदेव यात्रेतील सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे !

मांढरगडावरील श्री काळूबाई देवीची यात्रा १२ ते २९ जानेवारी या कालावधीमध्ये होत आहे. यात्रा शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून आपले दायित्व पार पाडावे. यात्रा कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी दक्षता घ्यावी….

जालना येथे ‘अखंड दिव्य ज्योत’ची भव्य संकीर्तन यात्रा !

जालना शहरात भव्य संकीर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आशीर्वाद स्वरूप अखंड दिव्य ज्योतीसह उत्साहपूर्ण साधकांचा समावेश होता.

कचरामुक्त पिंपरी-चिंचवडसाठी ८० ठिकाणांवर लक्ष केंद्रित करणार !

शहरातील कचराकुंड्या हटवल्यानंतर नागरिक मोकळ्या जागेवर कचरा टाकत आहेत. यामुळे आरोग्य विभागाने ८ क्षेत्रीय कार्यालयांतील ८० ठिकाणांची पहाणी करून तेथे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात फलकांना ऑनलाईन अनुमती देणे बंद करण्याचा शेखर सिंह यांचा आदेश !

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील नियमातील तरतुदीअन्वये महापालिकेची पूर्व अनुमती घेऊनच महापालिकेच्या, तसेच खासगी जागेत जाहिरात फलक उभा करण्यास अनुमती देण्यात येत होती; मात्र प्रत्यक्षपणे या पद्धतीचा अपवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

महिलेच्या शरिराची रचना (फिगर) यावर टिप्पणी करणे लैंगिक छळ ! – केरळ उच्च न्यायालय

केरळ राज्य विद्युत् मंडळाच्या कार्यालयात काम करणार्‍या महिला कर्मचार्‍याने प्रविष्ट (दाखल) केलेला लैंगिक छळाचा गुन्हा रहित करण्याची मागणी याच कार्यालयात काम करणार्‍या आरोपीने केली होती. न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.

अखिल भारतीय आखा ड्यांच्या सहस्रावधी साधू, संत आणि भक्तगण यांनी केला कुंभक्षेत्रात प्रवेश !

आचार्य महामंडलेश्‍वर, महंत, जगद्गुरु शंकराचार्य यांसह त्यांच्या भक्तगणांनी शहारामध्ये प्रवेश केला. हत्ती, घोडे, उंट यांवर स्वार होऊन, तलवारीची प्रात्येक्षिके, शेकडो धार्मिक आणि सांस्कृतिक चित्ररथ यांसह भव्य शोभायात्रेसह या सर्वांनी कुंभक्षेत्रात प्रवेश केला.

Yawatmal Govansh Freed : यवतमाळ (महाराष्ट्र) येथे कोंबून नेण्यात येणार्‍या १२१ गोवंशियांची मुक्तता !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना आणि सत्तेत हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांनाही गोवंशियांची तस्करी होते, ही स्थिती पोलिसांचा धाक नसल्याचेच दर्शवते !

SC On Freebies : काम न करणार्‍यांना वाटण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत; मात्र न्यायालयीन कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी नाहीत !

न्यायालयाने अशा योजनांवर बंदी घातली पाहिजे, असेच देशभक्त नागरिकांना वाटते !

सनातन संस्थेचे प्रदर्शन पाहून प्रभावित झालो ! – महंत भगवतीगिरिजी, गुजरात

महंत भगवतीगिरिजी महाराज हिंदूंना आवाहन करतो की, सनातन धर्माचे हे कार्य करण्यासाठी तुम्ही सहकार्य करा. संस्थेच्या माध्यमातून जे कार्य चालू आहे, त्यासाठी हातभार लावावा.

विहिंपकडून मौलाना शहाबुद्दीन यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट !

महाकुंभाची भूमी वक्फ बोर्डाची असल्याचे विधान केल्याच्या प्रकरणी विश्‍व हिंदु परिषदेने मौलाना शहाबुद्दीन यांच्याविरुद्ध येथील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.