कॅसिनोंमुळे राज्यशासनाला मागील ९ वर्षांत १ सहस्र २२७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त

कॅसिनोंमुळे राज्यशासनाच्या तिजोरीत १ सहस्र २२७ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. तरंगत्या कॅसिनोंमुळे ७८५ कोटी ५२ लाख रुपये, तर भूमीवरील कॅसिनोंमुळे ४९१ कोटी ७६ लाख रुपये राज्यशासनाला मिळाले.

हिंगोली जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ४० गावांमध्ये भूकंपाचे धक्के !

जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ या तालुक्यांमध्ये ३० जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी ४० गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची ३.२ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे.

अकोला येथील सनातनचे साधक तुषार काकड ठरले राज्यस्तरीय ‘गणलक्ष्मी करंडक एकपात्री साभिनय स्पर्धे’चे मानकरी !

‘गणलक्ष्मी करंडक एकपात्री साभिनय स्पर्धे’त सनातनचे साधक श्री. तुषार काकड या वर्षी ‘गणलक्ष्मी करंडक’चे मानकरी ठरले. सनातन परिवाराच्या वतीने अभिनंदन !

उच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही कृषीभूमीविषयी प्रशासन उदासीन का ? – ग्रामस्थांचा प्रश्‍न

गत २५ वर्षे नवीन कुर्ली गावात सहस्रो लोक वास्तव्य करत आहेत. ग्रामपंचायत नसल्याने त्यांना शासकीय कामांसाठी लागणारे दाखले मिळत नाहीत. गावातील रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत आवश्यकतांसाठी शासनाकडून निधी मिळत नाही.

भारताला सुराज्याकडे नेण्यासाठी अधिवक्त्यांचे संघटन आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ अधिवक्ता अधिवेशनाचे आयोजन

बंदूक दाखवून ओव्हरटेक करणारे ‘ते’ शिवसैनिक नाहीत ! – गृहराज्यमंत्री

वाहतूककोंडीतून सुटका करून घेण्यासाठी एक गाडीचालक आणि त्याचा सहकारी इतर वाहनचालकांना बंदुकीचा धाक दाखवत असल्याचा प्रकार मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर घडला होता.

रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापुरातील शिवम सहकारी बँकेचा परवाना रहित

भारतीय रिझर्व्ह बँकेने शहरातील शिवम सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रहित केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने बँकेने ही कारवाई केली आहे. या बँकेतील ९९ टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना ठेवीवर विमा संरक्षण आहे.

अतिक्रमितांना मोफत घराची बक्षिसी देणारे चित्र केवळ महाराष्ट्रात पहायला मिळते ! – उच्च न्यायालय

अतिक्रमण होऊ नये यासाठी कायदे करूनही त्याची कार्यवाही न करणार्‍या उत्तरदायी अधिकार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली, तरच अतिक्रमण करण्याचे कोणी धैर्य करणार नाही !

पुणे परिसर भूकंपप्रवण क्षेत्राच्या ‘झोन ३’ म्हणजे सर्वसाधारण धोका असलेल्या क्षेत्रात येतो ! – डॉ. हेमंत आठवले

कोयनेच्या भूकंपप्रवण क्षेत्राबाहेर पुण्यासारख्या महानगराच्या जवळपास केंद्र असलेले भूकंप हे अल्प तीव्रतेचे असले, तरी या घटनांचा भूशास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला जवेली खुर्द येथे ५७ वर्षानंतर प्रथमच निवडणूक पार पडली !

नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी सरकार कधी पावले उचलणार ?