रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापुरातील शिवम सहकारी बँकेचा परवाना रहित

कोल्हापूर – भारतीय रिझर्व्ह बँकेने शहरातील शिवम सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रहित केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने बँकेने ही कारवाई केली आहे. या बँकेतील ९९ टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना ठेवीवर विमा संरक्षण आहे. त्यामुळे प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या ठेवीनुसार ५ लाखांपर्यंत रक्कम मिळणार असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.