Odisha New CM : भाजपचे मोहन चरण मांझी होणार ओडिशाचे मुख्यमंत्री !

मोहन चरण मांझी

भुवनेश्वर (ओडिशा) – भाजपचे मोहन चरण मांझी हे ओडिशाचे नववे मुख्यमंत्री असतील. याखेरीज कनकवर्धन सिंगदेव आणि प्रभाती परिदा हे राज्याचे उपमुख्यमंत्री असतील.

केंद्रीय निरीक्षक राजनाथ सिंह आणि भूपेंद्र यादव यांनी भुवनेश्वरमध्ये पक्षाच्या आमदारांसमवेत झालेल्या बैठकीत तिघांच्या नावांची घोषणा केली.