‘जय श्रीराम’चा जयघोष, हिंदु जमावाने फ्रिज पळवला !

भुवनेश्वर (ओडिशा) – एका मुसलमान कुटुंबाच्या घरात गोमांस असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यावरून काही हिंदू त्याच्या घरात घुसले आणि त्या कुटुंबाला मारहाण केली, असा व्हिडिओ समोर आला आहे. या वेळी ते ‘जय श्रीराम’चा जयघोषही करत होते. मारहाण करणार्यांनी मुसलमान कुटुंबाचे शितकपाटही (‘फ्रिज’ही) उचलून नेले. त्यामध्ये मांस ठेवले होते. ते गोमांस असल्याचा आरोप हिंदूंनी केला आहे. या व्हिडिओत एक पोलीसही घटनास्थळी उपस्थित असल्याचे दिसत आहे. राज्यातील खोरदा येथे ही घटना घडली आहे.
काही दिवसांपूर्वी ओडिशातीलच बालासोर येथे तणाव निर्माण झाला होता. बकरी ईदच्या, म्हणजे १७ जूनला दोन जमावांमध्ये मारामारी झाली. यात १० लोक घायाळ झाले.
संपादकीय भूमिकाऑक्टोबर २०१५ मध्ये देहलीजवळच्या दादरी येथेही अशाच प्रकारे गोहत्याचा संशय येऊन अकलाख या मुसलमानाची हिंदूंनी कथित हत्या केली होती. यावरून एकजात हिंदू असहिष्णू असल्याची आवई जागतिक स्तरावर उठवण्यात आली. आता या घटनेवरूनही त्याची पुनरावृत्ती झाली, तर आश्चर्य वाटू नये ! |
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !