Rudram-II Missile Test : ‘रुद्रम-२’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी !

चांदीपूर (ओडिशा) – भारताने हवेतून भूमीवर मारा करणार्‍या ‘रुद्रम्-२’ नावाच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. स्वदेशी बनावटीचे ‘रुद्रम-२’ क्षेपणास्त्र हवेतून शत्रूचे रडार भेदण्यास सक्षम आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (‘डी.आर्.डी.ओ.’ने) हे क्षेपणास्त्र बनवले आहे. याची चाचणी ‘सुखोई-३० एम्के-१’ या लढाऊ विमानाद्वारे करण्यात आली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३०० किलोमीटर इतकी आहे. रुद्रम् क्षेपणास्त्र भारताची पहिले स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र आहे. भारतीय वायूदलासाठी ते विकसित करण्यात आले आहे.