S Jaishankar On POK : भारताचा अविभाज्य भाग असलेला पाकव्याप्त काश्मीर भारतियांना विसरायला लावला गेला !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची काँग्रेसचे नाव न घेता टीका !

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

कटक (ओडिशा) – पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तो भारताच्या बाहेर कधीच नव्हता; परंतु लोकांना हे विसरायला लावले गेले, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे केले. पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात आगामी काळात भारत शासनाची कोणती भूमिका असेल ?, असा प्रश्‍न त्यांना विचारला असता त्यांनी वरील उत्तर दिले.

परराष्ट्रमंत्री पुढे म्हणाले की,

१. भारतीय संसदेचा ठराव आहे की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा एक भाग आहे.

२. जेव्हा तुमच्याकडे कुणी घराचा उत्तरदायी रखवालदार नसतो, तेव्हा कुणीतरी बाहेरून चोरी करतो. स्वातंत्र्याच्या आरंभीच्या काळात भारताने पाकिस्तानला हा प्रदेश रिकामा करण्यास सांगितले नाही. त्यामुळेच ही खेदजनक स्थिती कायम राहिली.

३. काश्मीर ही एक समस्या होती कारण जोपर्यंत कलम ३७० होते, तोपर्यंत जम्मू- काश्मीरमध्ये फुटीरतावाद आणि आतंकवाद फोफावला होता. यामुळे तेथे हिंसाचाराला समर्थनही प्राप्त झाले होते.

५ मे या दिवशीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘भारताला पाकव्याप्त काश्मीरला ताब्यात घेण्याची आवश्यकता नाही’, असे म्हटले होते. ‘तेथील लोकच स्वत: भारताचा भाग बनू इच्छितात’, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर आता परराष्ट्रमंत्र्यांनी वरील विधान केले आहे.

संपादकीय भूमिका

भारताशी द्रोह करणार्‍या अशा काँग्रेसला भारतीयच आता तिची जागा दाखवून देतील, हे निश्‍चित !