Puri Firecracker Blast : पुरी (ओडिशा) येथे जगन्नाथ चंदन यात्रेच्या वेळी झालेल्या फटाक्यांचा स्फोटात १५ जण घायाळ : ४ जणांची प्रकृती चिंताजनक

पुरी (ओडिशा) – येथे २९ मेच्या रात्री भगवान श्री जगन्नाथाच्या चंदन यात्रेच्या  उत्सवाच्या वेळी फटाक्यांचा स्फोट होऊन १५ जण भाजले. या घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून यांतील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे. घायाळांच्या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.