शेकडो जण घायाळ !
पुरी (ओडिशा) – येथे ७ जुलैपासून जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेला आरंभ झाला. त्या दिवशीच्या सायंकाळी रथयात्रेच्या वेळी चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या प्रचंड गर्दीमुळे अनेक भाविक घायाळ झाले, तर एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. घायाळ झालेल्या भाविकांवर शासकीय रुगणालयात उपचार करण्यात येत आहेत. मृत व्यक्ती ही परराज्यातील असल्याचे सांगितले जात आहे.
Jagannath Rath Yatra 2024 : At least 1 devotee dead, several others injured in stampede-like situation
जगन्नाथ यात्रा #Odisha pic.twitter.com/YPYCrnVsm9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 8, 2024
रथयात्रेला देशभरातून लाखो भाविक पुरीत एकत्रित आले आहेत. ७ जुलैच्या सायंकाळी गर्दी प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरी होऊन शेकडो भाविक घायाळ झाले. श्री बलभद्र यांचा रथ ओढत असतांना ही दुर्घटना घडली. बलभद्र यांचा रथ ओढतांना सहस्रो भाविकांनी गर्दी केली होती.