मांडवे (जिल्हा सातारा) येथील सैनिक ज्ञानेश्वर खाडे हुतात्मा !

खटाव तालुक्यातील मांडवे येथील वीर सैनिक ज्ञानेश्वर हनुमंत खाडे (वय २१ वर्षे) यांना जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे वीरमरण आले. खटाव तालुक्यातील मांडवे गावचे पैलवान हनुमंत खाडे यांचे ते सुपुत्र होते.

उत्तरप्रदेशमध्‍ये अटक केलेल्‍या आरोपीचे मुंबई विमानतळावरून पोलिसांच्‍या तावडीतून पलायन !

आरोपींनी पोलिसांच्‍या हातावर तुरी देण्‍याच्‍या घटना वारंवार घडणे, हे पोलीस प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

 रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस !

प्रत्येक पावसाळ्यात परशुराम घाटात दरड कोसळण्याची घटना घडते. आता घाटात नवीन बांधलेली संरक्षक भिंतच कोसळल्याने ठेकेदार आस्थापनाने निकृष्ट काम केले नाही ना ? याचीही चौकशी होणे आवश्यक आहे !

दक्षिण मुंबईतून ४ बांगलादेशी महिला पोलिसांच्या कह्यात !

दक्षिण मुंबईमधील गिरगाव, ग्रँट रोड आणि गावदेवी परिसरात वास्तव्याला असलेल्या ४ बांगलादेशी महिलांना पोलिसांनी कह्यात घेतले. या चौघींपैकी १ महिला गेल्या १५ वर्षांपासून भारतात वास्तव्याला आहे. कामाच्या शोधात त्या बांगलादेशातून भारतात पळून आल्या होत्या.

आरोपीला कह्यात देण्याची मागणी; संतप्त जमावाकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक !

नागरिकांचा उद्रेक पहाता पोलिसांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !

राज्यातील ९०० शासकीय धान्य गोदामांचे होणार खासगी लेखापरीक्षण !

राज्यातील ९०० शासकीय धान्य गोदामांची मागणी, पुरवठा आणि गोदामातील शिल्लक साठा यांचे यापुढे खासगी लेखापरीक्षकाकडून लेखापरीक्षण केले जाणार आहे.

शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजपसमवेत कदापि जाणार नाही ! – उद्धव ठाकरे

आईसमान शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजपसमवेत कदापि जाणार नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्त मुंबईमध्ये घेतलेल्या मेळाव्यात केले.

पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास आम्हाला शस्त्रे घ्यावी लागतील !

भाजप आमदार नितेश राणे यांची चेतावणी

महाविकास आघाडीचा विजय ही तात्पुरती सूज ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाविकास आघाडीचा विजय ही तात्पुरती सूज आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात केले.

महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत कर्मचार्‍यांची ६ ऑगस्टपासून ‘काम बंद’ आंदोलनाची चेतावणी

महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत यांतील  कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात. या मागण्या मान्य न झाल्यास १ जुलै या दिवशी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येईल.