पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास आम्हाला शस्त्रे घ्यावी लागतील !

भाजप आमदार नितेश राणे यांची चेतावणी

भाजपचे आमदार नितेश राणे

महाड (जिल्हा रायगड) – महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे झालेल्या गोवंश हत्या प्रकरणी पोलीस संथगतीने अन्वेषण करत आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास आम्हाला हातात शस्त्रे घ्यावी लागतील, अशी चेतावणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. ‘महाड तालुक्यातील संबंधित पशूवधगृह लगेचच उद्ध्वस्त करा’, अशी मागणीही त्यांनी या वेळी पोलिसांकडे केली.

ते पुढे म्हणाले,…

१. पोलि‍सांवर आक्रमणे करण्याची समाजकंटकांची हिंमत होते कशी ?

२. गायीचे रक्षण करणार्‍यांवर होणारी आक्रमणेही यापुढे सहन करणार नाही. राज्यात कायद्याचे राज्य असतांना अशा पद्धतीच्या घडणार्‍या घटना घडणे दुर्दैवी आणि संतापजनक आहेत. संबंधितांना जशास तसे उत्तरे देऊ !

याप्रसंगी महाड आणि पोलादपूर येथील गोरक्षकांसह शेकडो हिंदुत्वनिष्ठ युवक उपस्थित होते.