दक्षिण मुंबईतून ४ बांगलादेशी महिला पोलिसांच्या कह्यात !

बांगलादेशी घुसखोरांचे माहेरघर बनलेले मुंबई शहर !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – दक्षिण मुंबईमधील गिरगाव, ग्रँट रोड आणि गावदेवी परिसरात वास्तव्याला असलेल्या ४ बांगलादेशी महिलांना पोलिसांनी कह्यात घेतले. या चौघींपैकी १ महिला गेल्या १५ वर्षांपासून भारतात वास्तव्याला आहे. कामाच्या शोधात त्या बांगलादेशातून भारतात पळून आल्या होत्या. (कामाच्या शोधासाठी येऊन मुंबईत अनधिकृतरित्या वास्तव्य करणार्‍यांचा शोध घ्यायला हवा ! – संपादक) नियमानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या चारही महिलांना बांगलादेशात पाठवण्यात येणार आहे.

माजिदा गुलाम जिक्रिया शेख आणि नूरजहाँबेगम सुल्तान मुल्ला अशी त्यांतील दोघींची नावे आहेत. बांगलादेशी नागरिकांना भारतात घुसखोरीसाठी साहाय्य करणार्‍या दलालांची माहिती घेण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.