सूरज चव्हाण यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

खिचडी घोटाळा प्रकरण

मुंबई – आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कोराना महामारीच्या काळातील खिचडी घोटाळ्याच्या प्रकरणी ‘ईडी’ कोठडीत असलेल्या सूरज चव्हाण यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने सूरज चव्हाण यांना आज मुंबई सत्र न्यायालयातील पी.एम्.एल्.ए. न्यायालयात उपस्थित केले. ७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता चव्हाण जामिनासाठी अर्ज करू शकतात.