पिंपरी (पुणे) – पवना नदी पात्रात राडारोडा टाकणार्या महिलेसह चौघांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. राडारोडा टाकून नदी प्रदूषित केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. या प्रकरणी महापालिकेचे आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आरोपींनी गट नंबर ९६ रहाटणी, काळेवाडी येथील पवना नदीपात्रामध्ये बांधकामाचा राडारोडा टाकला होता. त्यामुळे आरोपींवर पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ३, १५ अन्वये गुन्हा नोंद केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीपात्रामध्ये राडारोडा आणि मातीचा भराव टाकणार्यांकडून १ लाख १५ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला आहे.
संपादकीय भूमिका :केवळ गुन्हे नोंद करून न थांबता त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक ! |