१२६ किलो अमली पदार्थासह ३ कोटी ४६ लाखांपेक्षा अधिक रक्कम जप्त
मुंबई – एम्डी अमली पदार्थ विकून मिळालेली ३ कोटी ४६ लाखांपेक्षा अधिक रक्कम पोलिसांनी कुर्ला येथून जप्त केली आहे. या प्रकरणी एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून १२६ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. परविन बानू गुलाब शेख (वय ३३ वर्षे), साजिद महंमद आसिफ शेख उपाख्य डेबस (वय २५ वर्षे), इजाज अली अन्सारी (वय २४ वर्षे), आदिल इम्तियाज बोहरा (वय २२ वर्षे), प्रवीण उपाख्य नागेश रामचंद्र शिंदे (वय ३४ वर्षे), वासुदेव लक्ष्मण जाधव (वय ३४ वर्षे), प्रसाद बाळसो मोहिते (वय २४ वर्षे), विकास महादेव मलमे (वय २५ वर्षे), अविनाश महादेव माळी (वय २८ वर्षे), लक्ष्मण बालू शिंदे (वय ३५ वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत.
संपादकीय भूमिकाअमली पदार्थ विक्रीच्या प्रकरणात प्रतिदिन अनेक टोळ्यांना अटक होत असतांनाही अमली पदार्थांची विक्री न थांबणे गंभीर आहे ! |