The Diary Of West Bengal : ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’च्या निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी पाकमधील आतंकवादी संघटनेकडून धमकी
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारही चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये खोडा घालत असल्याचाही निर्मात्यांचा आरोप
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारही चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये खोडा घालत असल्याचाही निर्मात्यांचा आरोप
‘सेन यांनी बराच मोठा कालावधी कारागृहात घालवला आहे. त्यांचे वय बघता त्यांना जामीन मिळवण्याचा हक्क आहे’, असे मत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देतांना नोंदवले.
‘मेट्रो’च्या मार्गांवरील खांब तुमच्या मालकीचे असून त्यावर आचारसंहितेचा भंग होईल, असे कोणतेही विज्ञापन करू देऊ नका. विज्ञापन लावल्यास तात्काळ कारवाई करा, अशा आशयाचे पत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून ‘महामेट्रो’ प्राधिकरणाला देण्यात आले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुटी घोषित करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या खासगी आस्थापनांसाठी ही सुटी असणार आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणार्या प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने राज्य परिवहन (एस्.टी.) महामंडळाने राज्यात १ सहस्र ८८ विशेष बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्ष २००६ च्या शासन निर्णयानुसार ६५ वय झाल्यावर बंदीवानाला शिक्षेमध्ये सवलत देण्याचे प्रावधान आहे. या प्रावधानाच्या साहाय्याने शिक्षेत सवलत मिळावी, यासाठी अरुण गवळी याने न्यायालयात याचिका केली होती.
निलंबन रहित होऊन कामावर रुजू झालेल्या अधिकार्यांनी पुन्हा मतदान यंत्रांची चोरी केली, तर त्याला उत्तरदायी कोण ?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची अपकीर्ती केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अन्वेषण केले जात आहे; परंतु या अन्वेषणात विलंब होत असल्याची तक्रार सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी केली आहे.
अशी चेतावणी द्यावी लागणे नगरपरिषद प्रशासनाला लज्जास्पद ! असा हलगर्जीपणा करणारे आपत्काळात जनतेचे रक्षण कसे करणार ?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा ‘टीझर’ (विज्ञापन) प्रसारित करण्यात आला आहे. ९ एप्रिलला शिवतीर्थावर येण्याचे आमंत्रण यात देण्यात आले आहे.