कन्हाळगाव (जिल्हा चंद्रपूर) येथे अभयारण्य उभारण्यास ४७ गावांतील गावकर्‍यांचा विरोध  

शासनाने नुकतेच जिल्ह्यातील कन्हाळगाव अभयारण्य घोषित केले आहे. वन्यजीवप्रेमी संघटनांनी या नव्या अभयारण्याचे स्वागत केले आहे; मात्र गोंडपिंपरी, बल्लारपूर आणि पोंभुर्णा तालुक्यांतील ४७ गावांनी या अभयारण्याला विरोध केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे धायरी येथील कार्यालय पेटवून देण्याची धमकी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या धायरी येथील कार्यालयात २५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी सवा पाच वाजता जयंत रामचंद्र पाटील नामक व्यक्तीने दूरभाष करून कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली आहे.

नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवा ! – हिंदु जनजागृती समितीचे कागल तहसीलदारांना निवेदन

नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवावे, या मागणीचे निवेदन २१ डिसेंबर हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने कागल तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांना देण्यात आले.

मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई, पुणे आणि संभाजीनगर येथील ‘अ‍ॅमेझॉन’च्या कार्यालयांची तोडफोड

‘अ‍ॅप’मध्ये मराठीचा उपयोग करण्यावरून आडमुठेपणा करणार्‍या ‘अ‍ॅमेझॉन’च्या विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

आडेली गावच्या सरपंचांवरील अविश्‍वास ठराव संमत झालेली विशेष ग्रामसभा उच्च न्यायालयाकडून रहित

नियमबाह्य ग्रामसभा घेऊन संरपंचांना पदावरून हटवण्यामागे कुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत का, याचीही चौकशी होणे आवश्यक !

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्यासाठी ट्विटरवर २ हॅशटॅग ट्रेंड

#BanPFI हा हॅशटॅग ट्रेंड पहिल्या, तर #PFIExposed चौथ्या क्रमांकावर !

मुळदे येथील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान येथे दत्तजयंती उत्सव

तालुक्यातील मुळदे येथील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान, नवनाथ उपासक, प.पू. श्री बाळकृष्ण महादेव घडशी महाराज यांच्या तपोभूमीत दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत प्रतिदिन ‘गुरुचरित्रा’चे पारायण होत आहे.

वैद्यनाथ साखर कारखान्यातील चोरी प्रकरणी काँग्रेसच्या नगरसेविकेचा पती अजीज इस्माईल शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या कह्यात असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या चोरी प्रकरणी काँग्रेसच्या नगरसेविकेचे पती अजीज इस्माईल तथा मंगलदादा शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे २५ सहस्र आरोपींना जामीन

शहरात बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देणारी टोळी पुणे पोलिसांनी उघडकीस आणली आहे. शिवाजीनगरसह वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून ७ गुन्हे नोंद करत ३७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी येथील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक निलंबित !

गंभीर गुन्ह्यातील तपासात अधिकार्‍यांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या दोन अधिकार्‍यांना निलंबित केले.