राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे धायरी येथील कार्यालय पेटवून देण्याची धमकी

रूपाली चाकणकर

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या धायरी येथील कार्यालयात २५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी सवा पाच वाजता जयंत रामचंद्र पाटील नामक व्यक्तीने दूरभाष करून कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली आहे. धमकीचे कारण स्पष्ट झालेले नाही. याविषयी रूपाली चाकणकर यांचे स्वीय साहाय्यक राजदीप राजेंद्र कठाळे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात जयंत रामचंद्र पाटील यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.

‘कोणत्याही प्रकारचे राजकीय वैमनस्य नसतांना अशा प्रकारे अर्वाच्य भाषा वापरणार्‍या आणि कार्यालय पेटवण्याची धमकी देणार्‍या व्यक्ती विरोधात आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यावर पोलीस योग्य ती कारवाई करतील’, अशी प्रतिक्रिया यावर रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.