येत्या महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळेल ! – महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभाग

राज्यातील १४ सहस्र ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर कोल्हापूर, संभाजीनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार या महानगरपालिकांची निवडणूक होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोरेगाव भीमा येथे सभा घेण्यास राज्यशासनाची बंदी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोरेगाव भीमा येथील स्तंभाला अभिवादन करण्यासाठी सभा घेण्यास राज्यशासनाने बंदी घातली आहे. यासह स्तंभाच्या ठिकाणी प्रवेशावर, तसेच पुस्तक, खाद्यपदार्थ आणि अन्य कक्ष उभारणे यांवरही निर्बंध घालण्याची सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नववर्षारंभाच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या रात्रीचे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समिती प्रशासन आणि पोलीस यांना निवेदन

३१ डिसेंबर या दिवशी राज्यातील किल्ले, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, धूम्रपान करणे, मेजवान्या करणे आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश काढावा, तसेच या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखली जावी, यासाठी पोलीस दलाचे नियोजन करण्याची मागणी करणारे…

अमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी इन्सुली तपासणी नाक्यावर विशेष पथक तैनात

मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील इन्सुली येथील तपासणी नाक्यावर ख्रिस्ती नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र सरकार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांवर सूड उगवत आहे ! – आमदार नितेश राणे, भाजप

राज्यशासनाने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यात ४७ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले आहे; मात्र त्यांपैकी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत एकाही रुपयाची गुंतवणूक नाही…..

खालची रेवंडी येथे धूपप्रतिबंधक बंधारा तोडणार्‍यांवर कारवाई करा ! – रेवंडी ग्रामपंचायतीची मागणी

मालवण पतन विभागाने बांधलेला धूपप्रतिबंधक बंधारा तोडून, तसेच त्या ठिकाणच्या कांदळवन वृक्षाची बेसुमार तोड करणार्‍यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रेवंडी ग्रामपंचायतीच्या वतीने मालवणचे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या निवेदनाद्वारे केली आहे.

देवगड तालुक्यात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या युवकाला अटक

तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय मुलाने ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक घटना २४ डिसेंबरला घडल्याचे उघडकीस आले. याविषयी देवगड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरुद्ध ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करून संबंधित आरोपीस अटक केली आहे.

कन्हाळगाव (जिल्हा चंद्रपूर) येथे अभयारण्य उभारण्यास ४७ गावांतील गावकर्‍यांचा विरोध  

शासनाने नुकतेच जिल्ह्यातील कन्हाळगाव अभयारण्य घोषित केले आहे. वन्यजीवप्रेमी संघटनांनी या नव्या अभयारण्याचे स्वागत केले आहे; मात्र गोंडपिंपरी, बल्लारपूर आणि पोंभुर्णा तालुक्यांतील ४७ गावांनी या अभयारण्याला विरोध केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे धायरी येथील कार्यालय पेटवून देण्याची धमकी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या धायरी येथील कार्यालयात २५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी सवा पाच वाजता जयंत रामचंद्र पाटील नामक व्यक्तीने दूरभाष करून कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली आहे.