कागल (जिल्हा कोल्हापूर), २२ डिसेंबर (वार्ता.) – यंदाच्या वर्षी कोरोना महामारीने सर्वत्र कहर केला आहे. अनेक तज्ञ कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवत आहेत. अशा वेळी ३१ डिसेंबरला ‘पार्ट्यां’च्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यताही अधिक आहे. या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी किंवा ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणार्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर (‘सेलिब्रेशन’वर) बंदी घालावी, तसेच नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवावे, या मागणीचे निवेदन २१ डिसेंबर हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने कागल तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांना देण्यात आले.
या वेळी शिवसेनेचे कागल शहरप्रमुख श्री. किरण कुलकर्णी, धर्मप्रेमी सर्वश्री प्रमोद आरेकर, संदीप मगदूम, तुळशीदास गाडेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर आणि श्री. रोहित पाटील उपस्थित होते.