हिंदु जनजागृती समितीची प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा मोहीम !

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आली त्याचा वृत्तांत . …

भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा नोंद करून ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्यावा ! – मुख्यमंत्र्याना निवेदन

लेखक भालचंद्र नेमाडे यांनी या पुस्तकात हिंदु धर्मासमवेत जिल्ह्यातील १२ कोटी बंजारा समाज बांधवांच्या धर्मभावना दुखावल्या आहेत. त्या समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह लिखाण केले.

‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी घालण्यासाठी यावल (जिल्हा जळगाव) येथे निवेदन

देवतांचा अवमान करणार्‍या आणि जातीय द्वेष पसरवणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी आणून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सातारा येथे अल्पवयीन मुलीवर मोकाट श्‍वानांचे आक्रमण

सातारा शहर आणि परिसरामध्ये मोकाट श्‍वानांची समस्या गंभीर होत चालली आहे. सदर बाजार परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर मोकाट फिरणार्‍या ५-६ श्‍वानांनी आक्रमण केले.

नागपूर कारागृहातील गुन्हेगारासाठी चरस नेणारा सुरक्षारक्षक निलंबित !

पोलीस शिपायाने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याला बडतर्फ करणेच उचित ठरेल !

खोटे घरक्रमांक देणार्‍यांवर कारवाई न केल्याप्रकरणी देवबागचे माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश कद्रेकर यांचे उद्यापासून आमरण उपोषण

ग्रामपंचायत सदस्याने तक्रार करूनही त्याची नोंद न घेणारे निष्क्रीय प्रशासन काय कामाचे ?

पुण्यातील हडपसर, रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीत भीषण आग

पुण्यातील हडपसर भागात असलेल्या औद्योगिक वसाहतीत आस्थापनाच्या कचरा प्रकल्पाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्नीशमन दल आणि पोलीस दाखल झाले आहेत. यात जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

पुण्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ फेब्रुवारीपासून चालू होणार

शहरातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ फेब्रुवारीपासून चालू करण्यास अनुमती देण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

बिडकीन (जिल्हा संभाजीनगर) येथील ग्रामसेवक संजय शिंदे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी ३ जण निलंबित

ग्रामसेवक संजय शिंदे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ‘ग्रामसेवक युनियन’चे अध्यक्ष सखाराम दिवटे यांच्यासह अन्य दोघांना निलंबित केले आहे.

महाविद्यालये चालू करण्याच्या मागणीसाठी अ.भा.वि.प.च्या कार्यकर्त्यांचे आंदोलन  

राज्यातील महाविद्यालये चालू करावीत, यासाठी अ.भा.वि.प.च्या कार्यकर्त्यांनी २१ जानेवारी या दिवशी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्ग भरवून आंदोलन केले. शासनाने महाविद्यालये लवकर चालू करावीत, अशी मागणी अ.भा.वि.प.चे पुणे महानगरमंत्री शुभम भूतकर यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.