महापालिकेकडून नियमावली जाहीर
पुणे – शहरातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ फेब्रुवारीपासून चालू करण्यास अनुमती देण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली. या वेळी त्यांनी ‘मार्गदर्शक सूचना आणि अटी यांचे पालन करत शाळा चालू ठेवण्यास अनुमती देण्यात येत आहे’, असेही स्पष्ट केले आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांचे ‘ऑनलाईन’ वर्ग चालू आहेत.
शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांची ‘कोव्हिड १९’ची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी बंधनकारक केली असून हे प्रमाणपत्र परिमंडळ वैद्यकीय अधिकारी अन् क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांना सादर करणे आवश्यक असणार आहे.