नागपूर कारागृहातील गुन्हेगारासाठी चरस नेणारा सुरक्षारक्षक निलंबित !

नागपूर – येथील केंद्रीय कारागृहात लपवून अमली पदार्थ घेऊन जाणारा कारागृहातील पोलीस शिपाई महेश सोळंकी याला या प्रकरणी दोषी ठरवून २३ जानेवारी या दिवशी निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली होती. महेश हा मोज्यात लपवून अमली पदार्थ कारागृहात घेऊन येत होता. कर्मचार्‍यांच्या आकस्मिक अंगझडतीत त्याच्याकडे २८ ग्रॅम चरस सापडले होते. त्याचे मूल्य ७० सहस्र रुपये इतके आहे. (पोलीस शिपायाने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याला बडतर्फ करणेच उचित ठरेल ! – संपादक)

सौजन्य : एबीपी माझा