गोमूत्र अर्क प्यायल्यामुळे कोरोना झाला नाही ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

 

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

भोपाळ – गोमूत्र अर्क प्यायल्याने फुफ्फुसांतील संसर्ग दूर होतो. मी प्रतिदिन गोमूत्र अर्क पिते. त्यामुळे मला कोरोना झाला नाही. म्हणून प्रत्येकाने देशी गाय पाळली पाहिजे आणि गोमूत्र प्यायला पाहिजे, असे मत भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी व्यक्त केले. येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यासाठी त्या आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी हे मत वक्त केले.