|
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – मुसलमानांवर मी अन्याय होऊ देणार नाही. मी देशाच्या संपत्तीचे मुसलमानांना वाटप करत आहे, असे विधान राज्याचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी येथील मुसलमानांच्या संमेलनात केले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला भाजपकडून विरोध करण्यात आला आहे.
याविषयी भाजपचे नेते आर्. अशोक म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी केलेले हे वक्तव्य राज्य, आणि देश यांच्या दृष्टीने योग्य नाही. या आधी टिपू सुलतानवर अतीप्रेम दाखवल्याने काय झाले ? हिंदूंना हे (काँग्रेसवाले) दुसर्या (खालच्या) दर्जाची प्रजा म्हणून वागवत आहेत. काँग्रेस अतिशय धर्मांध आहे. सिद्धरामय्याही धर्मांध आहेत. मुख्यमंत्र्यांनी ‘अल्पसंख्यांक’, ‘बहुसंख्यांक’ असे म्हणणे थांबवले पाहिजे. ते राजकारणासाठी तुष्टीकरण करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी चांगले शासन देऊन आणि भ्रष्टाचार निर्मूलन करून जनतेसाठी कार्य केले, तर सर्व समुदायांना ते आवडेल. जनतेला योग्य आरोग्य सेवा मिळत नाही, पुरेशी वीज मिळत नाही, सरकार आत्महत्या करणार्यांना धनसाहाय्य करत नाही, तसेच हानी भरपाईही देत नाही.’’
संपादकीय भूमिका
|