पूत्तुरू (कर्नाटक) येथील सरकारी रुग्णालयातील घटना
पूत्तुरू (कर्नाटक) – ‘बुरखा काढून आत या’ अशी सूचना सरकारी रुग्णालयातील आत्पकालीन चिकित्सा कक्षाच्या फलकावर लावण्यात आल्याचे वृत्त सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर वाद निर्माण झाला. त्यामुळे हा फलक आता काढण्यात आला आला आहे.
रुग्णाची व्यवस्थित चिकित्सा करता यावी, यासाठी हा फलक लावण्यात आला होता. ‘इ.सी.जी.’साठी बुरखा काढूनच जावे लागते. बुरखा काढला नाही तर, चिकित्सा कशी करणार ?, असा अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कोणत्याही धार्मिक भावनेसाठी हा फलक लावलेला नाही, असे सांगण्यात येत आहे.
संपादकीय भूमिका
|