शिल्पकार अरुण योगीराज यांनी पोस्ट केले चांदीचा हातोडा आणि सोन्याची छन्नी यांचे छायाचित्र !

याद्वारे कोरले श्री रामलल्लाच्या मूर्तीचे डोळे !

चांदीच्या हातोड्याने आणि सोन्याच्या छन्नीने बनवलेले श्री रामलल्लाचे दिव्य डोळे

बेंगळुरू (कर्नाटक) – अयोध्येतील श्रीराममंदिरात स्थापित श्री रामलल्लाची मूर्ती घडवणारे कर्नाटकमधील शिल्पकार अरुण योगीराज यांनी सामाजिक माध्यम ‘एक्स’वर छिन्नी आणि हतोडा यांचे एक छायाचित्र पोस्ट केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, मी या चांदीच्या हातोड्याने आणि सोन्याच्या छन्नीने श्री रामलल्लाचे दिव्य डोळे बनवले होते. सगळ्यांना याची माहिती व्हावी; म्हणून पोस्ट केले.