शाळा आणि महाविद्यालये यांत धार्मिक सण साजरे करण्यास बंदी ! – कर्नाटक सरकारचा आदेश

मंत्री एच्.सी. महादेवप्पा

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्याच्या समाज कल्याण खात्याचे मंत्री एच्.सी. महादेवप्पा यांच्या आदेशानुसार अध्यादेश काढण्यात आला आहे. या अध्यादेशानुसार यापुढे निवासी शिक्षण संस्थांच्या अंतर्गत येणार्‍या शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये धार्मिक सण साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या अध्यादेशानुसार आता केवळ राष्ट्रीय सण, राज्याचा सण आणि मान्यवरांची जयंती साजरे करावी लागणार आहे. ‘धार्मिक सणांमध्ये गुढी पाडवा, रमझान, नाताळ, ईद, मकरसंक्रांत आदी सण साजरे करू नये’, असे यात म्हटले आहे. ‘धार्मिक सण साजरे केल्यास तेथील मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणी देण्यात आली आहे. १० राष्ट्रीय सण आणि जयंती साजरी करण्यामध्ये प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन, गांधी जयंती, कन्नड राज्योत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, वाल्मीकि जयंती, कनकदास जयंती, बसव जयंती, राज्यघटनादिन आणि योगदिन साजरा करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका 

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !