Most Wanted Maoist Karnataka Employee : ७ पोलिसांची हत्या करणारा माओवादी निघाला बेंगळुरू महानगरपालिकेचा कर्मचारी !

अशा माओवाद्याविषयी पोलिसांना माहिती न मिळणे आणि तो १९ वर्षे हाती न लागणे, हे कर्नाटक पोलिसांसाठी लज्जास्पद ! कुख्यात माओवादी एवढी वर्षे महानगरपालिकेत कार्यरत होता, ही गोष्ट त्याहून गंभीर आहे. यामागे कोणत्या प्रशासकीय अधिकार्‍यांचे हात आहेत का ?, याचेही अन्वेषण झाले पाहिजे !

तीर्थक्षेत्र हामुगड (जिल्हा बेळगाव) येथे २६ आणि २७ मे या दिवशी गोर बंजारा महासंमेलन !

गोर बंजारांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र हामुगड (अथनी, जिल्हा बेळगाव) येथे २६ आणि २७ मे या दिवशी गोर बंजारा महासंमेलन भरणार आहे.

Karnataka CAA Applications : ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’च्या अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी कर्नाटकातून १४५ अर्ज प्राप्त !

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून ३१ डिसेंबर २०१४ च्या आधी  आलेले हिंदू, शीख, ख्रिस्ती, जैन आणि पारसी यांना ‘सीएए’च्या अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यात येत आहे.

बेंगळुरूमधील ३ हॉटेल्सना बाँबने उडवण्याची धमकी

येथे पंचतारांकित ओटेरा हॉटेलसह एकूण ३ हॉटेल्सना अज्ञाताकडून बाँबने उडवून देण्याची ई मेलद्वारे धमकी देण्यात आली. पोलीस आणि बाँबशोधक पथक यांनी या हॉटेल्सची पडताळणी केल्यानंतर ही अफवा असल्याचे उघड झाले.

अवैधरित्या पिस्तूल बाळगणारे महंमद अस्कर आणि अब्दुल निसार या दोघांना अटक !

देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

इराणच्या राष्ट्रपतींच्या अपघाती मृत्यूनंतर कोडी मठाच्या स्वामीजींचे भविष्य खरे ठरल्याची चर्चा !

या वर्षाच्या प्रारंभी गदग येथे भविष्य सांगतांना स्वामीजी म्हणाले होते की, ‘गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अधिक संकटे येणार आहेत.१-२ राष्ट्रप्रमुखांचा मृत्यूदेखील होईल, असे लक्षण आहे.

Khalid Inamdar Murdered  Rohit : विजयपूर (कर्नाटक) येथे रोहित या हिंदु युवकाची खालिद इनामदार याने केली निर्घृण हत्या !

हत्या झालेल्या ठिकाणी एक कोयता, एक चाकू आणि दगड मिळाले आहेत. तिखटाची पूड टाकून घाव घालण्यात आले असल्याचेही समोर आले आहे.

Karnataka Crimes NCRB Report : कर्नाटकात मागील चार महिन्यांत ४३० हत्या आणि १९८ बलात्कार !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून राज्याची झालेली ही स्थिती काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍यांना लक्षात येणे महत्त्वाचे आहे. कर्नाटकातील स्थितीवरून देशातील अन्यत्रच्या लोकांनी जागे होणेही आवश्यक आहे !

आंदोला (कर्नाटक) येथील करूणेश्‍वर मठाचे पिठाधिपती सिद्धलिंग श्री यांच्या विरोधात जातीय निंदा केल्याचा गुन्हा नोंद !

जेवरगी तालुक्यातील आंदोला करूणेश्‍वर मठाचे पिठाधिपती असणारे श्रीराम सेनेचे अध्यक्ष सिद्धलिंग श्री यांच्याविरुद्ध कलबुर्गी येथे जातीवर आधारित निंदा केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Hubballi DCP Suspended : हुब्बळी (कर्नाटक) येथील अंजली अंबीगेर हत्येच्या प्रकरणी पोलीस उपायुक्त निलंबित !

येथील विद्यार्थिनी अंजली अंबीगेर हिच्या हत्येच्या प्रकरणी धारवाड शहराचे पोलीस उपायुक्त एम्. राजीव यांना निलंबित करण्यात आले आहे. याच प्रकरणात आणखी दोघांना निलंबित करण्यात आले आहे.