अवैधरित्या पिस्तूल बाळगणारे महंमद अस्कर आणि अब्दुल निसार या दोघांना अटक !

  • पिस्तुलाचे मूल्य ७ लाख रुपयांहून अधिक !

  • काहीतरी मोठे कारस्थान करण्यासाठी जात असल्याची होती माहिती !

(प्रतिकात्मक चित्र)

मंगळुरू (कर्नाटक) – अवैधरित्या पिस्तूल बाळगणार्‍या दोन आरोपींना मंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. केरळ राज्यातील कासरगोडु जिल्ह्यात असलेल्या मंजेश्‍वर येथील महंमद अस्कर आणि अब्दुल निसार के. अशी दोघांची नावे आहेत.

दोघेही मंगळुरूजवळ असलेल्या तळपाडी गावात एका चारचाकी वाहनातून अवैधरित्या पिस्तूल घेऊन काहीतरी मोठे कृत्य करण्यासाठी फिरत असल्याची विश्‍वसनीय माहिती मिळाल्यावर मंगळुरू पोलिसांनी कार्यवाही केली. या वेळी त्यांच्याकडून ७ लाख १५ सहस्र मूल्य असलेले पिस्तूल हस्तगत करण्यात आले. महंमद अजगर याच्याविरुद्ध आधीही अनेक गुन्हे नोंद असल्याचे समजते.

संपादकीय भूमिका

देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !