बेंगळुरूमधील ३ हॉटेल्सना बाँबने उडवण्याची धमकी

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे पंचतारांकित ओटेरा हॉटेलसह एकूण ३ हॉटेल्सना अज्ञाताकडून बाँबने उडवून देण्याची ई मेलद्वारे धमकी देण्यात आली. पोलीस आणि बाँबशोधक पथक यांनी या हॉटेल्सची पडताळणी केल्यानंतर ही अफवा असल्याचे उघड झाले. देशात गेल्या काही दिवसांत शाळा, हॉटेल्स, विमानतळे आदींना अशाच प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.