Khalid Inamdar Murdered  Rohit : विजयपूर (कर्नाटक) येथे रोहित या हिंदु युवकाची खालिद इनामदार याने केली निर्घृण हत्या !

पैशांच्या वादावरून हत्या केल्याचा संशय

विजयपूर (कर्नाटक) – येथील ए.पी.एम्.सी. बाजारातील पशूविक्री करणार्‍या रोहित पवार या तरुणाची खालिद इनामदार याने निर्घृण हत्या केली. खालिदने रोहितला चाकूने भोसकून आणि दगडांनी ठेचून ठार मारले. हत्येनंतर रोहितचा मृतदेह तेथील काटेरी झुडूपात फेकून खालिद फरार झाला. या वेळी त्याने रोहितच्या एका नातेवाईकाला रोहितची इंडी रस्त्यावर हत्या झाल्याचे सांगितल्याचे समजते. हे समजल्यावर रोहितचे कुटुंबीय आणि शेजारील लोक यांनी रोहितला शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचे शव ए.पी.एम्.सी. प्रांगणातील काटेरी भागात फेकलेले त्यांना आढळले.

१. घटनेची माहिती मिळताच पोलीस श्‍वानपथकासह त्वरित घटनास्थळी पोचले.

२. हत्या झालेल्या ठिकाणी एक कोयता, एक चाकू आणि दगड मिळाले आहेत. तिखटाची पूड टाकून घाव घालण्यात आले असल्याचेही समोर आले आहे.

३. रोहितच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार रोहितचा खालिद इनामदार याच्याशी पैशांचा व्यवहार होता. खालिद रोहितकडून पैसे घेत असे. या वादातूनच रोहितची खालिदने  इतरांच्या साहाय्याने हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

४. खालिदला अटक करण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागल्याचे स्थानिक पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !