DHIRIO Bull Game Goa : ‘धिर्यो’ खेळतांना मृत्यू झाल्याचा गुन्हा नोंदवून आयोजकांवर कारवाई करा !

‘धिर्यो’त एकाचा बळी गेल्याने कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘धिर्यो’ चालू असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. ‘धिर्यो’च्या आयोजनावर न्यायालयाची बंदी असतांनाही ‘धिर्यो’चे आयोजन केले जात असल्याने हा न्यायालयाचा अवमान आहे.

Gomantak Marathi Sahitya Samelan : चौफेर आघात होत असतांनाही गोव्याने वाङ्मयीन परंपरा सुरक्षित ठेवली ! – डॉ. सोमनाथ कोमरपंत

तत्कालीन शिक्षक, राष्ट्रप्रेमी साहित्यिक यांनी गोव्याबाहेरील मराठी साहित्य संमेलनातून देशभक्त निर्माण केले. शब्दांच्या शक्तीमुळे राष्ट्रजीवन घडते, याची प्रचीती आली.

Goa CM : उद्योगांच्या आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात पालट करण्याची सरकारची सिद्धता !

गोव्यातील युवक जी.पी.एस्.सी., यु.पी.एस्.सी. इत्यादी स्पर्धात्मक परीक्षांकडे दुर्लक्ष करत आहेत. विद्यार्ध्यांनी या परीक्षांकडे लक्ष दिल्यास ते रोजगारक्षम होतील.

Goa Crimes : गोव्यात प्रतिमास सरासरी २ हत्या आणि ८ बलात्कार होतात !

वर्ष २०२३ मध्ये उत्तर गोव्यात १६ आणि दक्षिण गोव्यात ९ हत्या मिळून एकूण २५ हत्या झाल्या आहेत. यांपैकी २४ प्रकरणांमध्ये संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

गोवा : कोमुनिदाद भूमीवरील अतिक्रमणाच्या तक्रारी १ वर्षाच्या आत सोडवण्याचे महसूलमंत्र्यांचे आश्‍वासन

गोवा भूमी बांधकाम निर्बंध कायदा १९९५ अंतर्गत कोमुनिदादच्या भूमींवरील अतिक्रमणाच्या तक्रारी १ वर्षाच्या आत सोडवल्या जातील. प्रशासकांना ते करण्याचा अधिकार आहे.

Goa LateNight Sound Pollution : मांद्रे आणि मोरजी समुद्रकिनार्‍यांवरील क्लबमध्ये कर्कश संगीत लावणार्‍या क्लबच्या व्यवस्थापकाला नागरिकांनी खडसावले !

रात्रीच्या वेळी होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात प्रशासन काही करत नसल्याने नागरिकांना ते रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो !

E-auction announced : वेर्णा (गोवा) औद्योगिक वसाहतीमधील भूखंडांचा ई-लिलाव घोषित

गोवा औद्योगिक विकास महामंडळाने वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्‍ये उद्योग व्‍यवसायांच्‍या स्‍थापनेसाठी भूमी भाडेपट्टीवर देण्‍यासाठी हा ई-लिलाव घोषित केला आहे.

Goa PradhanMantri Divyansha Kendra : बांबोळी येथे विकलांगांसाठी देशातील पहिले दिव्यांशा केंद्र

व्हीलचेअर्स, प्रोस्थेटिक्स, श्रवणयंत्रे आणि चष्मा इत्यादी सर्व कायमस्वरूपी आणि तात्पुरती उपकरणे विकलांग व्यक्ती, तसेच ज्येष्ठ नागरिक यांना केंद्रामार्फत विनामूल्य दिली जातील. याचबरोबर बांबोळी येथील मातृछाया केंद्रात ‘स्पाइनल रिहॅब सेंटर’देखील चालू करण्यात आले.

Goa : जाधव आयोगाचा अहवाल मंत्रीमंडळाने स्वीकारला !

अहवालात दिलेल्या सूचनांची सरकार योग्य वेळी कार्यवाही करील. बनावट कागदपत्रे वापरून बळकावलेल्या आणि विकल्या गेलेल्या सरकारी अन् कुणाच्याही नावावर नसलेल्या भूमी परत घेण्याचे काम सरकार प्रथम करील.

Goa : मासाभरात ३ नद्यांमधून वाळू उत्खननास पर्यावरण संमती मिळण्याची शक्यता

इतर राज्यांतून वाळूच्या वाहतुकीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात आले असून प्रतिफेरी ५०० रुपये शुल्क देऊन गोव्यात वाळू आणता येईल.