स्टेट बँक ऑफ इंडियाकडून २ भ्रमणभाष क्रमांकांपासून सावध रहाण्याची खातेदारांना सूचना

ऑनलाईन व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांत बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. फसवणूक करणारे गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गांनी लोकांना  जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अमेरिकी काँग्रेस सदस्याच्या पाकव्याप्त काश्मीर दौर्‍याचा भारताकडून निषेध

भारत किती दिवस असा निषेध करत बसणार ? आता शाब्दिक विरोधापुरते सीमित न रहाता पाकव्याप्त काश्मीरवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताने ठोस पावले उचलावीत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले भोंगे हटवण्यात यावेत !  

अशी मागणी हिंदूंना पुनःपुन्हा करावी लागू नये. याविषयी सरकारनेच आता ठोस पावले उचलून कारवाई करणे आवश्यक !

देहलीत भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

राजधानी देहलीतून देशाचा कारभार हाकला जात असतांना त्याच शहरात सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या होते, हे सरकारी यंत्रणेला लज्जास्पद !

जहांगीरपुरीतील अवैध बांधकामांवरील कारवाईवर स्थगिती कायम !

न्यायालयाच्या या निर्णयाचा उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश यांच्यासह संपूर्ण देशात चालू असलेल्या अवैध बांधकामांवरील कारवाईवर कोणताही परिणाम होणार नाही.

देशातील ५ कोटी घुसखोरांना बाहेर काढण्याची मागणी करणारी याचिका ५ वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित

देशातील कोट्यवधी घुसखोरांना बाहेर काढण्याची मागणी करण्यासाठी याचिका प्रविष्ट करावी लागते, हे देशासाठी लज्जास्पद !

देहली आणि नोएडा येथे विविध मंदिरांमध्ये करण्यात आली सामूहिक प्रार्थना !

हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्थान आणि सनातन संस्थचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवले जात आहे. देहली आणि नोएडा येथील सामूहिक प्रार्थनेच्या वेळी धर्मप्रेमींसह उपस्थित भाविकांनी सहभाग घेतला.

देहलीतील जहांगीरपुरी येथील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई

देशातील प्रत्येक अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली पाहिजे, यासाठी प्रशासन, पोलीस आणि शासनकर्ते सदैवच कृतीशील असले पाहिजेत, असेच जनतेला वाटते !

युनेस्कोच्या पुरातन वास्तूंच्या सूचीत भारतातील केवळ ४० नावे !

सहस्रो वर्षांचा इतिहास असणार्‍या भारतातील केवळ ४० वास्तूंची सूची प्रसिद्ध करणार्‍या युनेस्कोला पुरातन वास्तू ओळखता येतात का ? असाच प्रश्‍न उपस्थित होतो !

मराठी सैन्याधिकारी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे होणार २९ वे सैन्यदलप्रमुख !

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी जम्मू-काश्मीरमधील पल्लनवाला सेक्टरमध्ये ‘ऑपरेशन पराक्रम’च्या वेळी नियंत्रणरेषेजवळ इंजिनीयर रेजिमेंटचे नेतृत्व केले होते.