स्थलांतर करणार्‍या परप्रांतीय कामगारांची सर्व व्यवस्था करा ! – केंद्र सरकार

देशभरात दळणवळण बंदीमुळे विविध शहरांतूून सहस्रोंच्या संख्येने परप्रांतीय कामगार आपापल्या गावाकडे पायीच निघाले आहेत. याची गंभीर नोंद घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना त्यांची सर्व व्यवस्था करण्याचा आदेश दिला.

देहलीतील इस्लामी धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोना झाल्याच्या शक्यतेवरून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी मुसलमानांच्या ‘तबलीगी जमाती’ने एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात देश आणि विदेश येथून उपस्थित राहिलेले  धर्मगुरु आणि अन्य लोक परत त्यांच्या घरी गेले. यातील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘कॉग्निझंट’ आस्थापन कर्मचार्‍यांना अतिरिक्त वेतन देणार

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे आस्थापन असलेल्या ‘कॉग्निझंट’ने कर्मचार्‍यांसाठी सध्याच्या दळणवळण बंदीच्या काळात अतिरिक्त वेतन देण्याची घोषणा केली आहे.

कोरोनाविरोधात लढण्यासाठी सैन्य सज्ज ! – सैन्यदल प्रमुख

कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सैन्य पूर्ण सामर्थ्य देईल, असे प्रतिपादन सैन्यदल प्रमुख मनोज नरवणे यांनी केले.

रिझर्व्ह बँकेकडून विविध कर्जांच्या व्याजदरात कपात

देशभरात दळणवळण बंदी लागू असतांना अर्थव्यवस्था आणि कर्जभार असलेल्या व्यक्ती यांना आधार देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने विविध कर्जांच्या व्याजदरात कपात केली. मुदतीच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी ३ मासांपर्यंतची सवलत दिली आहे.

‘सीएए’चे समर्थन करणार्‍या १५ मुसलमानेतर विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याचे विधान करणारे धर्मांध प्राध्यापक निलंबित

येथील ‘जामिया मिलिया उस्मानिया विद्यापिठा’तील साहाय्यक प्राध्यापक अहमद अबरार यांनी ट्वीट करून नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (‘सीएए’चे) समर्थन करणार्‍या १५ मुसलमानेतर विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याचे विधान केले होते. याची नोंद घेत विद्यापिठाच्या प्रशासनाने त्यांना निलंबित केले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सी.आर्.पी.एफ्.च्या सैनिकांनी दिले एक दिवसाचे वेतन !

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी साहाय्य म्हणून प्रत्येक जण पुढे येऊ लागले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (‘सी.आर्.पी.एफ्.’च्या) सैनिकांनीही स्वेच्छेने त्यांचे एक दिवसाचे वेतन दिले आहे.

दळणवळण बंदीचे उल्लंघन केल्यास २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात ‘दळणवळण बंदी’ लागू करण्यात आली आहे. या बंदीचे संपूर्ण देशभर समान पद्धतीने पालन व्हावे, यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार दळवळण बंदीच्या निर्बंधांचे पालन न करणार्‍यांवर प्रशासन भा.दं.वि. कलम १८८ नुसार कारवाई करू शकते.

दूरदर्शनवर ‘रामायण’ मालिका २८ मार्चपासून पुन्हा प्रसारित करणार ! – केंद्र सरकार

दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे चित्रीकरण थांबल्याने त्यांचे प्रसारणही होत नाही, अशा वेळी ‘रामायण’ ही जुनी आणि अत्यंत गाजलेली मालिका दाखवण्याची मागणी लोकांकडून झाल्यामुळे केंद्र सरकारने ती दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला.

देहलीतील ‘मोहल्ला क्लिनिक’चा डॉक्टर, त्याची पत्नी आणि मुलगी यांना कोरोनाची लागण

येथील मौजपूरमधील ‘मोहल्ला क्लिनिक’च्या (देहली सरकारकडून चालवण्यात येणारे लहान चिकित्सालय) एका डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले आहे. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या ८०० जणांना विलगीकरण (क्वारंटाईन) करण्यात आले आहे.