(म्हणे) ‘आम्ही आमच्या भूभागावरच बांधकाम केले आहे !’

चीनने अरुणाचल प्रदेशमधील भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करून एक गाव वसवल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. त्यावर चुनयिंग यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

चीनमध्ये आईस्क्रीममध्येही आढळले कोरोनाचे विषाणू !

चीनमध्ये आईस्क्रीममध्येही कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. या आईस्क्रीमच्या ३९० डब्यांची विक्री करण्यात आली असून खरेदी करणार्‍या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

कोरोनाची उत्पत्ती कुठून झाली, हे शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चीनच्या वुहानमध्ये पोचले !

एक वर्षांनंतर वुहानमध्ये जाऊन या पथकाला काय सापडणार आहे ? चीनने यापूर्वीच कोरोनाविषयीच्या संक्रमणाचे सर्व पुरावे नष्ट केले असणार, हे लहान मुलही सांगील !

(म्हणे) ‘भारताकडून लडाखमधील पँगाँग तलावाजवळील नैसर्गिक वातावरण नष्ट करण्याचा प्रयत्न !’

भारत नाही, तर चीन येथील वातावरण प्रदूषित करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने येथील भाग सैन्य छावणीमध्ये परावर्तित केला आहे. येथे त्याने बंकर आणि ‘रडार स्टेशन’ उभारले आहेत.

सैन्याने कुठल्याही क्षणी कारवाईसाठी सिद्ध रहावे ! – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा आदेश

कुठल्याही क्षणी कारवाईसाठी पीपल लिबरेशन आर्मी सिद्ध असली पाहिजे. पूर्णवेळ युद्धजन्य परिस्थितीसाठी तुम्ही स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. प्रशिक्षण सरावामध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करा.

जॅक मा अज्ञातस्थळी देखरेखीखाली आहेत ! – चीनच्या सरकारी वृत्तपतत्रचा खुलासा

चीनमधील आणि जगातील मोठे उद्योगपती तथा ‘अलिबाबा’ समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा गेल्या काही मासांपासून सार्वजनिक ठिकाणी न दिसल्याने ते बेपत्ता असल्याचे वृत्त पसरले आहे.

चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेपर्यंत पूर्ण केले तिबेटला जोडणार्‍या रेल्वेमार्गाचे काम !

तिबेटमधील ल्हासा आणि नायींगशी या शहरांना जोडण्यासाठी चीनने रेल्वेमार्गासाठी रुळ बनवण्याचे काम पूर्ण केल्याची माहिती चीनमधील प्रसारमाध्यमांनी दिली आहे. हा मार्ग छिंघाई-तिबेट पठाराच्या आग्नेय दिशेकडून जाणार आहे.

पाकिस्तान चीनकडून खरेदी करणार कोरोनावरील लसीचे १२ लाख डोस !

चीननिर्मित कोरोना लसीमध्ये डुकराचा अंश असल्याची ओरड भारतातील मुसलमान संघटनांनी केली आहे; मग ‘पाकला चीनची ही लस कशी काय चालते ?’, भारतीय मुसलमान संघटना पाकला याविषयी प्रश्‍न विचारतील का ?

चीनकडून मणिपूरमधील आतंकवाद्यांना शस्त्रपुरवठा आणि प्रशिक्षण

गुप्तचर विभागांनी दिलेल्या माहितीनुसार चीन ईशान्य भारतात विशेषतः मणिपूरमधील आतंकवादी संघटनांना मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करत आहे. ४ आतंकवादी नेत्यांना ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये प्रशिक्षणही देण्यात आले होते.

चीनने नियंत्रणरेषेवर उभारल्या २० हून अधिक चौक्या !

यामागे चीनचा उद्देश येथील गस्त अधिक चांगली करून भारतावर लक्ष ठेवण्याचा आणि भारताला तत्परतेने प्रत्युत्तर देण्याचा असल्याचे म्हटले जात आहे.