(एखाद्या वस्तूची स्थिती आणि गती यांची माहिती देणार्या यंत्राला ‘रडार’ असे म्हणारत.)
बीजिंग – चीनने अलीकडेच म्यानमार सीमेजवळील युनान प्रांतात एक नवीन महाकाय रडार प्रणाली उभारली आहे, जी भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी धोकादायक बनली आहे. ‘लार्ज फेज्ड एरे रडार (एल्.पी.ए.आर्.) या प्रगत रडार प्रणालीचा पल्ला (रेंज) ५ सहस्र किलोमीटरपेक्षा अधिक आहे. या रडार प्रणालीद्वारे चीन हिंद महासागराच्या मोठ्या क्षेत्रावर तसेच भारतीय हद्दीत खोलवर देखरेख करू शकतो. चीनच्या या रडार प्रणालीचा सर्वांत मोठा धोका म्हणजे त्याला त्याद्वारे भारताच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर लक्ष ठेवता येते.
१. ‘एल्.पी.ए.आर्.’ हे एक अत्याधुनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची पूर्वसूचना देणारे रडार आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे जैविक, रासायनिक किंवा आण्विक अस्त्रे वाहून नेऊ शकतात. ‘एल्.पी.ए.आर्.’ ही प्रणाली चीनच्या विस्तारित संरक्षणाचा आधारस्तंभ असल्याचे म्हटले जाते. या प्रणालीमुळे चीनने भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर बारीक लक्ष ठेवण्याची क्षमता प्राप्त केली आहे.
२. भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने युनान प्रांतात ‘एल्.पी.ए.आर्.’ बांधले आहे. हे चीनच्या आक्रमकतेचे आणि त्याच्याकडे असलेल्या प्रगत यंत्रणेचे उदाहरण आहे.
३. भारताने अलीकडेच ‘अग्नी-५’ आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले आहे, ज्यामुळे चीन घाबरला आहे. भारत त्याचा हायपरसोनिक क्षेपणास्त्र कार्यक्रम वेगाने पुढे नेत आहे आणि चीन त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहे.
संपादकीय भूमिकाभारताने प्रत्येक क्षेत्रांत आणि त्याहून अधिक संरक्षणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात युद्धसज्ज होणे का आवश्यक आहे, हे यातून दिसून येते ! |