India Pakistan Ceasefire : (म्हणे) ‘भारत-पाक संघर्षामध्ये आम्ही मध्यस्थी केली !’ – चीनचा दावा
७ मासांनंतर चीनला आता याविषयी जाग कशी आली ? इतके महिने चीन झोपला होता का ? कि ट्रम्प यांचा श्रेय लाटण्याचा आजार चीनलाही झाला आहे ?
७ मासांनंतर चीनला आता याविषयी जाग कशी आली ? इतके महिने चीन झोपला होता का ? कि ट्रम्प यांचा श्रेय लाटण्याचा आजार चीनलाही झाला आहे ?
विस्तारवादी चिनी ड्रॅगनला धडा शिकवण्यासाठी त्याचा चेहरा जगासमोर उघडा पाडणे आवश्यक ! यासाठी आता भारताने कंबर कसली पाहिजे !
भारताने आता चीनला केवळ असे दरडावून थांबू नये, तर . . . ‘अरुणाचल प्रदेशाची भूमी भारताचीच आहे’, असे वारंवार मांडावे, तसेच प्रसारमाध्यमांद्वारेही राज्यातील वास्तविक परिस्थिती जगासमोर ठेवून चीनला उघडे पाडावे !
बरेच भाविक त्यांच्या भ्रमणभाषवरून धूप आणि उदबत्ती फिरवतांना दिसतात. ‘असे केल्याने देव दान स्वीकारतात आणि आशीर्वादही देतात’, असा त्यांचा विश्वास आहे.
चीन आणि पाकिस्तान या दोघांनीही अणूचाचण्या केल्याचा ट्रम्प यांचा दावा फेटाळला आहे, तर आता ट्रम्प यांनी जगाला या संदर्भात पुरावे दाखवले पाहिजेत, अन्यथा ट्रम्प यांच्यावरील विश्वास आणखी न्यून होईल !
अमेरिकेची २ विमाने अर्ध्या घंट्याच्या अंतराने दक्षिण चीन समुद्रात २६ ऑक्टोबर या दिवशी कोसळली. यामध्ये एक ‘एम्एच्-६० आर् सीहॉक’ हेलिकॉप्टर आणि दुसरे ‘एफ् / ए – १८ एफ् सुपर हॉर्नेट’ लढाऊ विमान होते.
चीनी विद्वानांनी ‘भगवद्गीते’स ‘ज्ञानाचे अमृत’ आणि ‘भारतीय संस्कृतीचा संक्षिप्त इतिहास’ असे संबोधले. भगवद्गीतेचा गौरव करतांना ते म्हणाले की, भगवद्गीता आधुनिक जगातील लोकांच्या आध्यात्मिक आणि भौतिक संकटांवरील उपायांचा स्रोत आहे !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी चीनवर १०० टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानंतर चीनने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चीनच्या अर्थमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, मुळात चीनला लढायचे नाही; मात्र चीन युद्धाला घाबरतही नाही.
चीनमध्ये हवेत उडणार्या चारचाकी वाहनांच्या चाचणीच्या वेळी २ वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाला. यात एक वाहन खोली कोसळून त्याला आग लागली, तर दुसरे सुखरूप खाली उतरले.
चीनमध्ये प्रवेश केल्यानंतर ‘के व्हिसा’धारकांना उद्योजक आणि व्यावसायिक यांना चीनच्या शिक्षण, संस्कृती आणि तंत्रज्ञानातील शैक्षणिक देवाण-घेवाण, यात भाग घेण्याची अनुमती दिली जाईल.