Muhammad Yunus : (म्हणे) ‘आमचे सरकार धर्म आणि राजकीय मत यांच्या आधारे भेदभाव करणार नाही !’ – बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख प्रा. महंमद युनूस

बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख प्रा. महंमद युनूस यांचे आश्‍वासन !

प्रा. महंमद युनूस

ढाका (बांगलादेश) – आमचे सरकार भिन्न धर्मांचे पालन करणारे किंवा भिन्न राजकीय मत असणारे, अशा कुणाशीही भेदभाव करणार नाही. आम्हाला देशातील सर्व सदस्यांना एका कुटुंबात समाविष्ट करायचे आहे. नवीन बांगलादेशामध्ये धार्मिक अल्पसंख्यांक, जमाती आणि उपेक्षित समुदाय समान नागरिक असून त्यांना समान अधिकार असतील, असे आश्‍वासन बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख प्रा. महंमद युनूस यांनी २५ ऑगस्ट या दिवशी देशाला दूरचित्रवाहिनीवरून संबोधित करतांना दिले.

ढाका येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

बांगलादेशाची राजधानी ढाका आणि इतर शहरांमध्ये हिंदूंच्या मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. ढाका येथे जन्माष्टमीनिमित्त मोठी मिरवणूक काढण्यात आली आहे. बांगलादेशात ५ ऑगस्टला शेख हसीना सरकार पडल्यानंतर जातीय सलोखा बिघडल्यामुळे यंदाच्या जन्माष्टमीच्या कार्यक्रमांविषयी अनेक प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. अशा परिस्थितीत महंमद युनूस यांच्या भाषणानंतर प्रतिवर्षीप्रमाणे ढाका येथे जन्माष्टमी साजरी झाली.

संपादकीय भूमिका

यावर कोण विश्‍वास ठेवणार ? प्रा. युनूस यांनी प्रथम पीडित हिंदूंना हानीभरपाई देऊन त्यांच्यावर अत्याचार करणार्‍यांवर कारवाई करून दाखवावी !