मुझफ्फरपूर (बिहार) रेल्वे स्थानकाजवळील प्राचीन मंदिर हटवल्याच्या विरोधात हिंदु संघटनांचे आंदोलन

मुझफ्फरपूर (बिहार) – येथील मुझफ्फरपूर रेल्वे स्थानक परिसरात बांधण्यात येणार्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी येथे असणारे मंदिर दुसरीकडे भूमी देऊन हटवण्यात आले. या प्रकरणी हिंदु संघटनांनी रेल्वे स्थानकाजवळ आंदोलन करत रेल्वेमार्गाजवळील मशीद हटवण्यात न आल्याने विरोध चालू केला आहे. परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने स्टेशन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
विश्व हिंदु परिषदेने रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांना एक निवेदन सादर केले आहे. विहिंपचे नेते अविनाश झा यांच्या मते, १० मार्चच्या रात्री रेल्वे प्रशासनाने कोणतीही सूचना न देता मंदिर पाडले. मंदिरात प्राचीन अष्टधातू मूर्ती होत्या, ज्याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आमची मुख्य मागणी आहे की, मंदिर पुन्हा त्याच ठिकाणी स्थापित करावे आणि सर्व मूर्ती पुन्हा मंदिरात स्थापित कराव्यात.
संपादकीय भूमिकामशीद हटवण्याचे धाडस कोणत्याही सरकारमध्ये नसल्याने अनधिकृत असली, तरी तिच्यावर कारवाई होत नाही ! |