
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या ‘इंटेलिंक’ नावाच्या एका अॅपवर लैंगिकतेविषयी संभाषण केल्यावरून तब्बल १०० हून अधिक गुप्तचर अधिकार्यांना बडतर्फ केल्याची माहिती स्वत: राष्ट्रीय गुप्तचर संस्थेच्या संचालिका तुलसी गॅबर्ड यांनी दिली. लेखक क्रिस्टोफर रुफो यांनी हा गैरप्रकार उघड केला.
१. गुप्तचर अधिकार्यांची वर्गीकृत आणि संवेदनशील सुरक्षा सूत्रांविषयी चर्चा करण्यासाठी ‘इंटेलिंक’ नावाचे अॅप बनवण्यात आले आहे. या अत्यंत सुरक्षित अॅपचा वापर अश्लील गोष्टींच्या संभाषणांसाठी करण्यात आला. यात लिंग पालटाच्या शस्त्रक्रियांवरील चर्चाही समाविष्ट होती.
२. या प्रकरणी गॅबर्ड म्हणाल्या की, व्यावसायिक वापरासाठी असलेल्या या अॅपचा वापर करून असे वर्तन करणे निर्लज्जपणाचे आहे. संबंधित अधिकार्यांना केवळ कामावरूनच काढून टाकले जाणार नाही, तर त्यांचे सुरक्षा परवानेही रहित केले जाणार आहेत.