हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांची जिल्हाधिकार्यांना पत्र लिहून मागणी

अजमेर (राजस्थान) – हिंदु सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी महाशिवरात्रीला येथील अजमेर दर्ग्यात भगवान शिवाची पूजा करण्याची अनुमती देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी अजमेर जिल्हाधिकार्यांना पत्र लिहिले आहे. विष्णु गुप्ता यांनी अजमेर दर्ग्यात भगवान शिव मंदिर असल्याची न्यायालयात आधीच याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. याचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. गुप्ता यांच्या याचिकेत वर्ष १९११ मध्ये हरविलास शारदा यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख आहे.
विष्णु गुप्ता यांनी जिल्हाधिकार्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाशिवरात्र हा सण वर्षातून एकदा येतो. हा सण हिंदू मोठ्या उत्साहात साजरा करतात. भगवान शिव यांना तो समर्पित आहे आणि हिंदु धर्मात त्याचे विशेष महत्त्व आहे.

संपादकीय भूमिकाभारतात अनेक ठिकाणी हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मुसलमानांनी मशिदी अथवा दर्गे बांधले, हा इतिहास आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्वच ठिकाणांचे सर्वेक्षण करून सत्य समोर आणणे आवश्यक आहे अन्यथा अशा मागण्या होतच रहातील ! |